आशिया कपमधील भारत आणि श्रीलंकेचा सामना सुरु झाला आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी भारताला सामना जिंकणे गरजेचे आहे.
सर्वांच्या नजरा इशान किशनवर आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध दमदार बॅटिंग केली होती.
इशान या मॅचमध्ये जुना हिशोब चुकता करणार आहे. नेपाळच्या खेळाडूने दिलेली ही 7 वर्षे जुनी 'जखम' आहे.
त्यावेळी अंडर 19 मध्ये खेळणाऱ्या संदीप लामिछानेबद्दल आपण बोलतोय. 2016 साली इशान त्या टिमचा कॅप्टन होता.
1 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इशानने 52 रन्सची खेळी केली. त्यानंतर संदीपने त्याला आऊट केले. पंतच्या खेळीमुळे इंडियाने 7 विकेट्सने हा सामना जिंकला होता.
त्या मॅचमध्ये इशानने संदीपला 3 चौके आणि 1 सिक्स मारला होता. संदीपने आपल्या फिरकीमध्ये इशानला फसवले होते.
इशान सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यालाही त्याने परतवून लावले. त्यामुळे नेपाळविरुद्ध तो चांगला खेळ करेल असे म्हटले जात आहे.