पाकिस्तान चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नौशीन शाहने बॉलीवूड क्वीन कंगना रनौतला ओपन चॅलेंज दिलं आहे. कंगना रनौतला दोन कानाखाली मारायचं असल्याचं नौशीनने म्हटलं आहे.

पाकिस्तानचा लाईव्ह शो हद कर दी मध्ये नौशीन सहभागी झाली होती. यावेळी अँकरला विचारेल्या प्रश्नावर बोलताना नौशीने भारतीय अभिनेत्री कंगना रनौतला भेटायचं असल्याचं सांगितलं.

यावर अँकरने कंगना भेटण्यामागचं कारण विचारलं. यावर उत्तर देताना नौशीन म्हणाली आयुष्य एकदा कंगना रनौतला भेटायचं आहे. कंगनाला भेटण्यामागचं कारणही तीने सांगितलं.

नौशीनने सांगितलं, कंगनाला भेटून तिच्या दोन कानाखाली मारायच्या आहेत. ती माझ्या देशाबद्दल नेहमी वाईट वक्तव्य करत असते. पाकिस्तानच्या सैन्याबद्दल नको त्या कमेंट करते.

कंगनाचं सामान्य ज्ञान झिरो आहे, कंगनाने आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रीय करावं, आपले वाद आणि एक्स बॉयफ्रेंडवर लक्ष द्यावं असा टोमना नौशीने लगावला.

पाकिस्तानबद्दल तुला नेमकं काय माहित आहे, याबद्दल कंगनाला समोर बसून जाब विचारायचा आहे. असंही नौशीने म्हटलं आहे.

नौशीन शाह पाकिस्तान टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'मन चले', 'तडप', 'मेरा पहला प्यार', 'बेबसी' या पाकिस्तानमध्ये गाजलेल्या मालिकेत तीने काम केलं आहे.

कंगना रनौत लवकरच चंद्रमुखी-2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय कंगना 'इमरजेंसी'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारतेय.

VIEW ALL

Read Next Story