भारताच्या आर प्रज्ञाननंदाने अगदी लहान वयातच डोंगराएवढी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या 18 वर्षी प्रज्ञानंदने बुद्धीबळ खेळात संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे.

प्रज्ञाननंदाने फिडे चेस वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारत इतिहास रचला आहे. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

फिडे चेस वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रज्ञाननंदाचा सामना असेल तो जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या मॅग्नस कार्लसनशी. प्रज्ञाननंदाने याआधी एकदा कार्लसनवर मात केली आहे.

वयाच्या अवघ्या तीसऱ्या वर्षी प्रज्ञाननंदाला बुद्धीबळ खेळाचा आवड निर्माण झाली. प्रज्ञाननंदाची बहिण वैशाली 2018 मध्ये ग्रँडमास्टर आहे. तर 2021 मध्ये ती इंटरनॅशनल मास्टर बनली

इतर लहान मुलांप्रमाणेच प्रज्ञाननंदालाही कार्टुनची आवड होती. पण त्याचा कार्टुनचा नाद सोडवण्यासाठी वैशालीने प्रज्ञाननंदाला बुद्धीबळ खेळाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी प्रज्ञाननंदाने अंडर-7 इंडियन चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं. त्यानंतर एशियन चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. हा प्रवास इथेच थांबला नाही.

अंडर-8 आणि अंडर-10 वर्ल्ड यूत चेस स्पर्धेतही त्याने खिताब जिंकलं. 2016 मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी प्रज्ञाननंदाने केआईआईटी इंटरनेशनल चेस फेस्टिवलमध्ये इतिहास रचला

10 वर्ष, 10 महिने आणि 19 दिवसांच्या वयात प्रज्ञाननंदा इंटरनॅशनल मास्टर बनला. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. 2018 मध्ये तो ग्रँड मास्टर बनला.

VIEW ALL

Read Next Story