AI Generated Photo नाही तर खरंच 'हा' क्रिकेटपटू झाला शेफ; विराटची प्रतिक्रिया चर्चेत

या क्रिकेटपटूची पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असतानाच विराटने दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आहे. पाहा नेमकं घडलंय काय

AI फोटो नाही

हा जो फोटो दिसतोय तो AI म्हणजे आर्टिफिशिएल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार करण्यात आलेला नाही. खरोखरच हा भारतीय क्रिकेटपटू शेफ झाला आहे.

हा खेळाडू कोण?

अर्थात तुम्ही या क्रिकेटपटूला ओळखलं असेलच. बरोबर हा आहे सुरेश रैना.

चक्क किचनमध्ये रमला रैना

रैना सध्या त्याच्या आयुष्याच्या सेकेण्ड इनिंगमध्ये रमलाय चक्क किचनमध्ये आणि ते ही एका खास कारणासाठी.

कुठे सुरु केलं हे हॉटेल?

रैनाने नेदरलॅण्ड्सची राजधानी असलेल्या अ‍ॅम्सटरडॅममध्ये एक हॉटेल सुरु केलं आहे.

आता तुम्हालाही चाखता येणार चव

यासंदर्भातील माहिती त्यानेच इन्स्ताग्रामवरुन दिली आहे. आपल्याला जेवण बनवण्याची आवड असून आता तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता येईल असं रैनाने या पोस्टमध्ये म्हटलंय.

भारतीय चवींचं माहेरघर

युरोपमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागांमधील चवींचं माहेरघर म्हणून माझं हे हॉटेल ओळखलं जाईल आणि तसाच माझा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

प्रत्येक डिश सांगेल गोष्ट

येथील प्रत्येक डिश ही एखादी कथा तुम्हाला सांगेल आणि भारतीय संस्कृती साजरी करणारी असेल, अशा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे.

उत्तर ते दक्षिण

उत्तर भारतामधील मसालेदार जेवणापासून ते दक्षिणेतील पारंपारिक खाद्यपदार्थांची चव तुम्हाला रैना रेस्तरॉमध्ये चाखता येईल असं रैनाने म्हटलं आहे.

विराटकडून शुभेच्छा

विराटनेही यासाठी शुभेच्छा दिल्या असून आम्ही तिथे आल्यावर नक्की या हॉटेलला भेट देऊ असं तो म्हणालाय.

VIEW ALL

Read Next Story