QR Code Alert: ऑनलाइन पेमेंट करत असताना आता QR कोडचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे. पण, QR कोड स्कॅन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
Online Payments : ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठा वाढला आहे. QR कोड स्कॅन करताना सावध राहा. अन्यथा मोठे नुकसान होईल.
Online Payments: सध्या लहानसहान गोष्टींसाठी प्रत्येकजण ऑनलाइन पेमेंटचा वापर करतो. बँकेत पैसे पाठवण्यासाठी लोक ऑनलाइन बँकिंगचा वापर करायला लागले आहेत. याशिवाय, चहाचे किंवा भाजीचे पेमेंट करण्यासाठी लोक QR Code चाही मोठ्या प्रमाणात वापर सध्या होत आहे. सुपरमार्केटपर्यंत आता QR Code द्वारे पेमेंट केले जात आहे
आज प्रत्येक जण QR Code द्वारे पेमेंट करताना दिसतो.या प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटमुळे वेळेची बचत होते यात शंकाच नाही. परंतु, त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यताही वाढते. फसवणूक करणारेही याबाबत सक्रिय असून या क्यूआर कोडच्या नावाखाली लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढतात. म्हणूनच क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घेतली पाहिजे.
हॅकर्स क्यूआर कोडद्वारे फसवणूक करत आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कोणी तुम्हाला पैसे पाठवण्याचा दावा करत असेल तर, ती फसवणूक असू शकते. अशा वेळी सावध राहण्याची गरज आहे.
QR कोड स्कॅन केला असता जर तो तुम्हाला अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर घेऊन जात असेल तर तुम्हाला अशा लिंक्समधून बाहेर पडावे लागेल.
कारण असे अॅप्स तुमच्या फोनमधील स्पायवेअर डाऊनलोड करु शकतात आणि तुमची गोपनीय माहिती चोरु शकतात. त्यामुळे फसवणूक होऊ शकते.
अनेक वेळा फसवणूक करणारे क्यूआर कोड लोकांना पाठवतात आणि सांगतात आणि त्यांचे पेमेंट येथून पूर्ण होईल. पण QR कोडद्वारे फक्त पैसे पाठवले जाऊ शकतात.
जर कोणी तुम्हाला QR कोड स्कॅन करून पैसे घेण्यास सांगत असेल तर, अशा लोकांपासून सावध राहा आणि तसे करु नका. थर्ड पार्टी अॅपवर दिलेला QR कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.