विक्रमाच्या 'या' यादीतून शाहीद आफ्रिदीचं नाव खोडून रोहितने स्वत:चं नाव लिहिलं

रोहितच अर्धशतक

भारताचा कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये अर्थशतकीय खेळी करत संघाचा उत्तम सुरुवात मिळवून दिली.

चौकाराने अर्धशतक

रोहितने 44 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावताना 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितने चौकार मारत अर्धशतक साजरं केलं.

अर्धशतक झळकावून बाद

मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर रोहित बाद झाला. डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजी खेळताना चेंडूने उसळी न घेतल्याने रोहित गोंधळला आणि चेंडूने रोहितच्या पाय आणि पॅडमधून गॅप काढत स्टम्प्सचा वेध घेतला.

अनोखा मान मिळवला

आपल्या या खेळीमध्ये रोहितने आशिया चषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज होण्याचा मानही मिळवला आहे.

पाकिस्तानविरुद्ध 4 षटकार

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहितने 4 षटकार लागवल्याने त्याच्या आशिया चषकामधील षटकांची संख्या 26 वर पोहचली होती.

दासुन शनाकाला लगावला षटकार

आज त्याने दासुन शनाकाच्या गोलंदाजीवर सामन्यातील पहिला षटकार लगावत ही संख्या 27 वर नेली.

दोघेही होते पहिल्या स्थानी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि शाहीद आफ्रिदी हे प्रत्येकी 26 षटकांसहीत पहिल्या स्थानी होते.

लगावले 2 षटकार

रोहितने सामन्यातील सातव्या षटकात एक षटकार लगावला आणि त्यानंतर 11 व्या षटकामध्ये 39 धावांवर असताना दुसरा षटकार मारला.

2 पावलं पुढे गेला

अर्धशतक झळकावण्याआधी लगावलेल्या या 2 षटकांसहीत रोहित शाहीद आफ्रिदीच्या 2 पावलं पुढे गेला आहे.

VIEW ALL

Read Next Story