या कसोटी सामन्यांदरम्यान जडेजा, शम्मीआणि केएल राहूल हे जखमी झाले होते.
अश्यातच आता शुभमन गीलला तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान फिल्डींग करताना दुखापत झाली.
त्यामुळे शुभमन गीलला पुढच्या सामन्यात फिल्डींग करता येणार नाही, अशी माहिती BCCI ने दिली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमनने 11 चौकार आणि 2 षटकारांची कामगिरी करत शतक पूर्ण केले.
विझाग कसोटी सामन्यात शुभमन गीलने टीम इंडीयासाठी 104 धावांची विक्रमी कामगिरी केली.
हैदराबाद दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलला गंभीर दुखापत झाली होती, मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत राहुल पुर्णपणे बरा होईल असे सांगितले आहे.
शमी पायाला झालेल्या दुखापतीमुळे अजूनही पुर्णपणे ठीक झालेला नसून तो लंडन येथे उपचार घेत आहे.
टीम इंडियाचे हे दमदार खेळाडू उपस्थित नसताना ही प्रतिकुल परीस्थितीत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने आपला विजय खेचून आणला.