वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम, आहारात बदल, पौष्टिक आहार, जीवनशैलीत बदल असे अनेक प्रयत्न केले जातात.
मात्र, काहीचं वजन कमी होतं. तर काहींचं नाही. कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होत असेल तर हे आजाराचे लक्षण आहे.
अचानक वजन कमी होणं, याचा संबंध अस्थीभंगाशी (फॅक्चर) उच्च जोखमीशी असू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं आहे.
एडिथ कोवन विद्यापीठातील डॉ. कॅसँड्रा स्मिथ यांच्या वैद्यकीय पथकाने यावर संशोधन केलंय. त्यासाठी संशोधकांनी 929 वृद्ध महिलांच्या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केला.
जलद वजन कमी होण्याची शक्यता पोटाच्या महाधमनी कॅल्सीफिकेशनशी जोडलेली आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
कोणत्याही ठोस कारणांशिवाय वजन कमी होणं हे गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजाराचंही लक्षण आहे, असंही संशोधनात समोर आलंय.
12 महिन्यांच्या कालावधीत शरीराच्या वजनाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त घट होणं म्हणजे जलद वजन कमी होणं, असा त्याचा अर्थ होतो.
जलद वजन कमी होणं याचा संबंध अस्थिभंगाशी आहे. त्यावर उपचार न केल्यात जीवाला धोका असू शकतो, असंही संशोधकांनी सांगितलं आहे.