वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यावर रवाना होण्याआधी क्रिकेटपटू बागेश्वर बाबांच्या चरणी

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी क्रिकेटपटूने घेतले बागेश्वर बाबांचे आशीर्वाद

वेस्ट इंडिजच्या संघाविरोधात भारत खेळणार

भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या संघाविरोधात लवकरच 2 कसोटी, 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे.

भारताच्या टी-20 संघात कुलदीपला स्थान

भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवलाही भारताच्या टी-20 संघात या मालिकेसाठी स्थान मिळालं आहे.

बागेश्वर बाबांच्या भेटीला

कुलदीप विंडीजला रवाना होण्याच्या आधी बागेश्वर बाबांच्या भेटीला पोहोचला. बागेश्वर धाम सरकारच्या ट्वीटर हॅण्डलवरुन हे फोटो शेअर करण्यात आलेत.

बाबांच्या जन्मोत्सवाच्या सहभागी

कुलदीप बागेश्वर बाबांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. त्याने बागेश्वर बाबांच्या चरणाशी बसून त्यांचे आशीर्वाद घेतले.

वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी

कुलदीपने मागील काही काळापासून अनेकदा वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच वृंदावनला जाऊन आला

काही दिवसांपूर्वीच कुलदीप वृंदावनला जाऊन आला आहे. त्याने येथील काही फोटो शेअर केलेले.

आईबरोबर करतो देवदर्शन

कुलदीप अनेक धार्मिक स्थळांवर देवदर्शनासाठी त्याच्या आईबरोबर जातो.

महाकालेश्वर मंदिरातही दर्शनासाठी गेलेला

जानेवारी महिन्यातही कुलदीप सुर्यकुमार यादव आणि अन्य काही सहकाऱ्यांबरोबर उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात भोलेनाथाच्या दर्शनासाठी गेला होता.

100 हून अधिक सामने भारतासाठी खेळला

8 कसोटी, 81 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 सामने कुलदीप भारतीय संघासाठी खेळला आहे.

दमदार कामगिरी

कुलदीपने 214 विकेट्स घेतल्या आहेत. विंडीजविरुद्ध त्याची कामगिरी दमदार असल्याने तो चमकदार कमागिरी करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

VIEW ALL

Read Next Story