टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बांग्लादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सीरिजमध्ये गोलंदाजी सह फलंदाजीतही दमदार कामगिरी केली.
आर अश्विनने या सामन्यात 113 धावा करून शतक ठोकले तर 6 विकेट्स सुद्धा घेतल्या. या कामगिरीमुळे आर अश्विनने अनेक रेकॉर्डस् नावे केले.
टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर असलेल्या रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊयात.
आर अश्विन भारतासाठी सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने 522 विकेट्स घेतले.
अश्विन भारताकडून टेस्टमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने 37 वेळा एका मॅचमध्ये 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.
भारतासाठी सर्वाधिक 10 विकेट घेणाऱ्यांमध्ये आर अश्विनचा समावेश आहे.
आर अश्विन सर्वात जलद 250 300 आणि 350 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये आठव्या नंबरवर फलंदाजीसाठी येऊन सर्वाधिक वेळा शतक ठोकणाऱ्यांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आर अश्विन हा भारतासाठी सर्वाधिक 10 वेळा प्लेअर ऑफ द सीरिज अवॉर्ड जिंकणारा खेळाडू आहे.