22 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने भारतीय क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकींची युनिक नाव जाणून घेऊयात.
भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला दोन मुली असून त्यांची नाव 'अखिरा आणि आध्या' अशी आहेत.
भारताचा माजी क्रिकेटर आशिष नेहरा याच्या मुलीचे नाव 'अरियाना' असं आहे.
माजी फलंदाज सुरेश रैनाच्या लाडक्या लेकीचे नाव 'ग्रेसिया' असं आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या लेकीचं नाव ' सामायरा' असून तिला 'सॅमी' या टोपणनावाने हाक मारतात.
माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मुलीचं नाव 'सना' असं आहे.
क्रिकेटर अजिंक्य रहाणेच्या लाडक्या लेकीचं नाव 'आर्या' असं आहे.
टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरच्या मुलीचे नाव 'आझीन आणि अनाइझा' अशी आहेत.
भारताला पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांच्या मुलीचं नाव 'अमिया' असं आहे.
विराट कोहलीच्या मुलीचे नाव 'वामिका' असं आहे.