...तर पाकिस्तान नाही तर अफगानिस्तान

पोहोचणार सेमीफाइनला? जाणून घ्या समीकरण

वर्ल्ड कपच्या स्पर्धेत दिवसेंदिवस रंगत वाढत आहे. या स्पर्धेत कमजोर समजल्या जाणाऱ्या टीम बलाढ्य टीमवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. 23 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात तिसरा मोठा अपसेट पाहिला मिळाला.

चेन्नईमध्ये झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील रोमांचक सामन्यात अफगाणिस्ताने 8 विकेट्सने विजय पटकावला.

सेमीफायनलसाठी पात्र ठरण्यासाठी आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. एकही सामन्यात पराभव झाला तर तो संघ स्पर्धेतून बाहेर होईल.

पण दोन्ही संघासाठी करो की मरोची स्थिती निर्माण झाली आहे. जर या दोन्ही संघांनी त्यांचे सर्व सामने जिंकले तर पॉइंट्स टेबलमधील समीकरण अतिशय रंजक होणार आहे.

अफगाणिस्तानला आता 30 ऑक्टोबरला श्रीलंका, 3 नोव्हेंबर नेदरलँड्स, 7 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया आणि 10 नोव्हेंबर दक्षिण ऑफ्रिकाशी दोन हात करणार आहे.

तर पाकिस्तानला 27 ऑक्टोबला दक्षिण ऑफ्रिका, 31 ऑक्टोबर बांगलादेश, 4 नोव्हेंबर न्यूझीलंड आणि 11 नोव्हेंबर इंग्लंडला हरवणं गरजेचं आहे.

जर अफगाणिस्तान आणि पाकिस्ताने सर्व सामने जिंकल्यानंतर उपांत्य फेरीसाठी निव्वळ धावगती पाहिली जाईल. ज्यामध्ये त्यांचा सामना हा आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धा करताना दिसणार आहेत.

दुसरीकडे पॉइंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड सेमीफाइनल गाठण्याची दाट शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story