आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला.
या सामन्यात पाकिस्तानचा प्रमुक वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या नावावर एक लाजीरवाणा रेकॉर्ड जमा झालाय.
न्यूझीलंडने पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. न्यूझीलंडने 401 धावांचा डोंगर उभा केला.
या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने दहा षटकं गोलंदाजी केली आणि यात तब्बल 90 धावांची खैरात दिली. विशेष म्हणजे त्याला एकही विकेट घेता आली नाही.
वर्ल्ड कपच्या इतिहासात इतकी खराब गोलंदाजी करणारा शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
पाकिस्तानच्या हारिस रौफनेदेखील या सामन्यात तब्बल 85 धावा दिल्या. पाकिस्तानचा तो दुसरा सर्वात जास्त धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 6 विकेट गमावत 401 धावा केल्या. यात रचिन रविंद्रने तुफानी शतक ठोकलं.