आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलसाठी झगडणाऱ्या न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडला सलग तीन पराभव पत्करावे लागलेत. त्यातच आता संघाचा मॅचविनर खेळा़डू संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी दुखापतग्रस्त झाला असून उरलेल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.

मॅट हेनरीच्या जागी वेगवान गोलंदाज काएले जेमिन्सनला बोलावण्यात आलं आहे. पंधरा खेळाडूंच्या संघात जेमिन्सनचा समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंड व्यवस्थापनाने याबाबत निवेदन जारी केलं आहे. मॅट हेनरीच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून भारतात सुरु असलेल्या विश्वचषकातून तो बाहेर पडत असल्याचं यात माहिती देण्यात आली आहे.

न्यूझीलंड संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून यात चार सामन्यात विजय मिळवलाय. तर सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे.

न्यूझीलंडचा पुढचा सामना 4 नोव्हेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story