टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हार्दिक मैदानात कधी कमबॅक करणार याची उत्सुकता भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.

Oct 28,2023


19 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यालाही त्याला मुकावं लागलं.


बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पुढचे तीन सामने तरी खेळणं शक्य नाहीए. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


हार्दिक पांड्या आता दुखापतीतून सावरतोय त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सरावही सुरु केला आहे. शनिवारी त्याने जिममध्ये काही वेळ व्यायाम केला.


सेमीफायनलमध्ये हार्दिक टीम इंडियात असणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे सेमीफायनलआधीच्या शेवटच्या लीग सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे.


टीम इंडियाचे इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडविरुद्धचे सामने बाकी आहेत. यापैकी नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा कमबॅक होऊ शकतो.


टीम इंडियाने आयसीसी विश्वचषकात सलग पाच सामने जिंकत सेमीफायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे दुखापतीतून सारवरण्यासाठी हार्दिक पांड्याला पुरेशी विश्रांती देण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story