किती पैसे मोजावे लागणार?

जुन्या दागिन्यांवर आताच लावून घ्या हॉलमार्क; यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात

Gold Hallmarking Charges: सणासुदीच्या दिवसांना आता सुरुवात झाली असून, या दिवसांमध्ये आता खरेदीलाही प्राधान्य दिलं जाणार आहे. सोनं खरेदीही त्यातलीच.

हॉलमार्किंगचे नियम

सध्या देशात गोल्ड हॉलमार्किंगचे नियम लागू असल्यामुळं आता 6 आकड्यांच्या HUID च्या सोनं विक्रीचीच परवानगी आहे.

हॉलमार्क नाहीये?

तुमच्याकडेही असे दागिने आहेत का, ज्यांच्यावर हॉलमार्क नाहीये? तर आधीच दागिन्यांनाना मार्किंग करून घ्या. ज्यानंतर तुम्हालाही जुन्या दागिन्यांची विक्री करता येईल.

जीएसटी

हॉलमार्किंगसाठी सोन्याच्या दागिन्यंसाठी प्रती दागिना 45 रुपये आणि जीएसटी अशी किंमत आकारली जाते.

दागिने प्रमाणित करण्याची रक्कम

चांदीच्या दागिन्यांना प्रमाणित करण्यासाठी प्रती दागिना 35 रुपये आणि जीएसटी अशी रक्कम आकारली जाते.

भारतीय मानक ब्यूरो

भारतीय मानक ब्यूरो (BIS)नं 1 एप्रिल 2023 पासून हॉलमार्क असणाऱ्या सोन्याच्या आभूषणांसाठी सहा आकड्यांचा ‘अल्फान्यूमेरिक’ एचयूआयडी अनिवार्य केला आहे.

VIEW ALL

Read Next Story