टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

शुभमनचा धक्का टीम इंडियाला बसला असतानाच आता शबनमचा धोका टीम इंडियासमोर उभा राहिला आहे.

आता तुम्ही विचार करत असाल शबनम कोण आहे? 'शबनम' म्हणजे 'दव'. मैदानावर पडणार दव टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतं.

वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवला. खराब कामगिरीबरोबरच इंग्लंडच्या पराभवाचं दुसरं मोठं कारण ठरलं 'दव'

खेळपट्टीवर दव पडल्याने गोलंदाजांना मदत मिळत नाही. त्यामुळेच 283 धावांचं टार्गेट न्यूझीलंडने 36.2 षटकातच सहज पूर्ण केलं.

भारत-ऑस्ट्रेलियाचा सामनाही दिवस-रात्र खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी फलंदाजी आल्यास टीम इंडियासमोर त्यांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story