विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कोहली आपल्या बॅटने अनेक विक्रम रचेल अशी चाहते अपेक्षा बाळगून आहेत.
कोहलीनेही आपल्या चाहत्यांना कधीच निराश केलेलं नाही. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने हे विक्रम रचला आहे. पण तो बॅटने नाही तर फिल्डिंगमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली गोलंदाजी करताना टीम इंडियाला तिसऱ्याच षटकात यश मिळालं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये विराट कोहलीने मिचेल मार्शचा अप्रतिम झेल टिपला.
या झेलबरोबर विराट कोहलीच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झालाय. वर्ल्ड कप इतिहासत विराट भारतातर्फे सर्वाधिक कॅच घेणारा फिल्डर बनलाय.
विराट कोहलीने वर्ल्ड कप स्पर्धेत विराटने आतापर्यंत 15 कॅच टिपलेत. याआधी हा विक्रम दिग्गज खेळाडू अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने 14 कॅच घेतल्यात.
विराट आणि कुंबळे शिवाय वर्ल्ड कपमध्ये कपिल देव आणि सचिन तेंडुलकरच्या नावावर प्रत्येकी 12 कॅचचा रेकॉर्ड आहे.
फलंदाजीचा विचार केला तर या विश्वचषक स्पर्धेत विराटची नजर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांवर असेल. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी विराटला केवळ 3 शतकं हवीत.