खाऊ नका, अन्यथा...
अल्कोहोलचं सेवन करताना अनेकांना त्याच्यासोबत चकणा म्हणजे काही ना काही खाण्याची सवय असते. पण अल्कोहोलसोबत चुकीच्या पदार्थाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुठले पदार्थ दारुसोबत टाळावे याबद्दल जाणून घ्या.
गोड पदार्थ कधीही अकोल्होलसोबत खाऊ नयेत. त्यामुळे हँगओव्हरचा त्रास होतो.
मसालेदार पदार्थ देखील अकोल्होलसोबत सेवन करु नयेत. त्यामुळे तुम्हाला पोटाच्या त्रास होऊ शकतो.
अकोल्होलसोबत एनर्जी ड्रिंक्स कधीही घेऊ नयेत. यामुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम होतो.
तळलेले पदार्थ अकोल्होलसोबत खाऊ नयेत. त्यामुळे तुमची पचन क्रिया मंद होते.
उच्च चरबीयुक्त पदार्थ कधीही अल्कोहोलसोबत सेवन करु नये.
दुग्धजन्य पदार्थ आणि अल्कोहोल हे घातक कॉबिनेशन आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)