यंदाच्या विश्वचशषकात विजेत्या संघांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. विजेत्या संघाला तब्बल 33.17 कोटी रुपयांची प्राईज मनी मिळणार आहे.

विश्विचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोनही संघांना प्रत्येकी 6.63 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

इतकंच नाही तर ग्रुप स्टेजमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला 33.17 लाख रुपये दिले जाणार आहेत.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आयसीसीकडून तब्बल 82.95 कोटी रुपये प्राईज मनी म्हणून वाटण्यात येणार आहे.

पण तुम्हाला माहित आहे का क्रिकेट विश्वचषक आणि फुटबॉल विश्वचषकाच्या विजेत्या संघााला मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेत जमीन अस्मानाचा फरक आहे.

2022 मध्ये लायनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषक जिंकला. विजेत्या अर्जेंटिना संघाला तब्बल 347 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. म्हणजे क्रिकेट विश्वचषकापेक्षा 300 कोटी जास्त ही रक्कम आहे.

2022 फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपविजेता संघ फ्रान्सला 248 कोटी रुपये बक्षिस देण्यात आलं होतं. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रोएशियाला 223 कोटी रुपये देण्यात आले होते.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघालाही 206 कोटी रुपये बक्षीस देण्यात आलं होतं. म्हणजे क्रिकेट विश्वचषक आणि फुटबॉल विश्वचषकाच्या प्राईज मनीमध्ये मोठं अंतर आहे.

VIEW ALL

Read Next Story