एकामागोमाग एक 10 Flop चित्रपट ते 100 कोटींची हामी देणार सुपरस्टार; 'तो' कोण?

Swapnil Ghangale
Oct 05,2023

एकमेव अपवाद

चित्रपट एकामागोमाग एक फ्लॉप होणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र एक चित्रपट फ्लॉप झाला तरी करिअर उद्धवस्त झालेले अनेक अभिनेते आहेत. मात्र याला एक अपवादही आहे.

तुम्हाला अमिताभ बद्दल बोलतो असं वाटलं असेल तर...

आता तुम्हाला आपण अभिताभ बच्चनबद्दल बोलत आहोत असं वाटत असेल मात्र हा अभिनेता अमिताभ नाही.

त्याला अनेक नवीन हिरो फॉलो करतात

90 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याला अनेक नवीन हिरो फॉलो करतात.

सहकलाकार म्हणून पहिला चित्रपट

1988 साली 'बीवी हो तो ऐसी' चित्रपटातील सहकलाकार म्हणून या अभिनेत्याने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.

तो टिकून राहिला, लढत राहिला

नंतर हा अभिनेता बॉलिवूडचा सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या करिअरमध्ये पाहिलेले चढउतार पाहता दुसरा कोणी असता तर नक्कीच खचला असता. मात्र तो टिकून राहिला.

तो अभिनेता कोण?

तुम्हाला कळलं असेलच की आपण सलमान खानबद्दल बोलतोय. सलमानच्या करिअरमधील सर्वात वाईट काळ हा 1991 ते 1994 दरम्यान होता.

ती 3 वर्ष सर्वात वाईट

1991 ते 1994 दरम्यान सलमाने एकामागोमाग एक अनेक चित्रपट आपटले. तब्बल 10 चित्रपट तिकिटबारीवर दणक्यात आपटले.

हे 10 चित्रपट पडले

'सूर्यवंशी', 'जागृति', 'निश्चय', 'एक लड़का एक लड़की', 'दिल तेरा आशिक', 'चंद्रमुखी', 'चांद का टुकड़ा', 'अंदाज अपना अपना' आणि 'संगदिल सनम' हे सलमानचे 10 चित्रपट पडले अपयशी ठरले.

ब्लॉकबस्टर चित्रपटांची रांग

मात्र 10 चित्रपट तिकीटबारीवर पडल्यानंतरही सलमान काम करत राहिला आणि त्यानंतर त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची रांगच लागली.

...अन् वाईट चित्रपटांचा दुष्काळ संपला

सूरज बडजात्या यांनी दिर्ग्दर्शित केलेल्या 'हम आपके हैं कौन' या 1994 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने सलमानचा वाईट चित्रपटांचा दुष्काळ संपला.

30 वर्षांपूर्वी कमवले 72,46,50,000 रुपये

सलमानच्या 'हम आपके हैं कौन'ने त्या काळी 72,46,50,000 रुपये कमवले. हा चित्रपट सलमानचा ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

त्याची भूमिका चांगलीच लक्षात राहिली

यानंतर 1995 मध्ये आलेला 'करन अर्जुन', 1999 चा 'हम साथ-साथ हैं' चांगलाच गाजला. यामधील सलमानची भूमिका चांगलीच लक्षात राहिली.

तो सुपरस्टार झाला

त्यानंतर 'दबंग','रेडी', 'बॉडीगार्ड', 'एक था टाइगर' आणि 'दबंग' सारख्या चित्रपटांनी सलमान खानला सुपरस्टार बनवलं.

तो म्हणजे 100 कोटींचा गल्ला निश्चित

सध्या सलमान खान म्हणजे 100 कोटींचा गल्ला फिक्स असं समीकरण आहे. सलमानचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

VIEW ALL

Read Next Story