भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. गेल्या दहा वर्षात भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.

यंदा हा दुष्काळ संपेल आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2011 च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा करोडो भारतीय बाळगून आहेत.

टीम इंडियाचा पहिला सराव सामना पावसामुळे होऊ शकला नाही. आता दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाच्या मिशन वर्ल्डकपला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भरताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून चेन्नईतल्या चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाईल.

त्यानंतर 11 ऑक्टोबरला दिल्लीत भारत आणि अफगाणीस्तानचा संघ आमने सामने येतील.

विश्वचषक स्पर्धेत सर्वांचं लक्ष लागलेला पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.

त्यानंतर 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशविरुद्ध तर 22 ऑक्टोबरला धरमशाला मैदानात न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया दोन हात करेल.

भारत आणि इंग्लंड लखनऊमध्ये 29 ऑक्टोबरला भिडतील. तर 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध मुबंईत टीम इंडिया खेळेल.

त्यानंतर 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत कोलकाता आणि 12 नोव्हेंबरला बंगळुरुत नेदरलँडविरुद्ध टीम इंडियाचा सामना होईल.

VIEW ALL

Read Next Story