बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर जय शाह हे पद भूषणवणारे पाचवे भारतीय ठरले.
जय शाह हे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र आहेत. जय शाह हे 1 डिसेंबर पासून आयसीसी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
जय शाह यांची बीसीसीआय सचिव पदाची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. ते अनेकदा त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत आले होते. तेव्हा जय शाह यांची संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात.
जय शाह हे 35 वर्षांचे आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण हे गुजरातमध्ये झाले, त्यानंतर त्यांनी निरमा विद्यापीठातून बी. टेक ची पदवी घेतली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार जय शाह यांची एकूण संपत्ती 124 कोटी असून त्यांची सर्वाधिक कमाई ही व्यवसायातून होते.
आयसीसीचे अध्यक्ष पद भुसावणाऱ्या व्यक्तीला निश्चित पगार नसतो. त्यांना प्रवासाचा खर्च, बैठकांसाठी आणि खर्चासाठी आयसीसीकडून भत्ता मिळतो. प्रत्येक दिवसासाठी आयसीसी अध्यक्षांना 1000 डॉलर म्हणजे 80 हजार भत्ता म्हणून दिले जातात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांनी टेंपल एंटरप्राइजमध्ये डायरेक्टर पद भूषवले आहे. कुसुम फिनसर्व्हमध्ये त्यांची सुमारे 60 टक्के भागीदारी आहे.