ICC विश्वचषक 2023 ची बहुप्रतिक्षित 13 वी आवृत्ती 05 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सुरू होणार आहे. या वर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.

विश्वचषक 2023 मध्ये 45 साखळी सामने आणि तीन बाद फेरीचे सामने असतील.

दरम्यान, स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे एकूण भारतातील १० शहरांमधील स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.

ही स्पर्धा ग्रुप स्टेज (सुपर 10) आणि नॉकआउट स्टेज (सुपर 4) अशा दोन फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. सुपर 10 चा प्राथमिक टप्पा सर्व 10 संघ खेळतील. दरम्यान, सुपर 4 चा तिसरा आणि शेवटचा टप्पा चार पात्र संघ खेळतील.

ICC विश्वचषक 2023 चे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सुरू होतील.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आयसीसी विश्वचषक २०२३ चे सर्व सामने थेट प्रक्षेपित करेल.

विश्वचषक २०२३ चे सामने Disney+ Hotstar वरही मोफत लाइव्ह-स्ट्रीम केले जाणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story