टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?
अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांच्या दोस्तीचे अनेक किस्से सांगितले जातात. अनिल कुंबळेचा विक्रम होण्यासाठी श्रीनाथने वाईड बॉलची ओव्हर टाकली होती. त्यावेळी मित्रासाठी त्याने नकोसा विक्रम नावावर केला होता.
टीम इंडियाची स्टार जोडी म्हणजे वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर. या दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी अनेक सामने खेळले आहेत. दिल्लीच्या या खेळाडूंची दोस्ती टीम इंडियामध्ये येण्यापासून होती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या नातं काळानुसार अधिक घट्ट होत गेलं. आजही दोघे एकमेकांसाठी मदतीला धावून येतात.
टीम इंडियाचे पंजाबी शेर म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्या मैत्रीच्या शपथा देखील घेतल्या जातात. याहून अधिक सांगायचं काय?
राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची मैत्री म्हणजे न तुटणारा मैत्रीचा धागा. सोबत खेळताना दोघं चांगले मित्र झाले.
वर्ल्ड कप विनर कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ यांनी टीम इंडियात आल्यापासून दोस्तीचे अनेक किस्से ऐकवले आहेत.
एकाच्या निवृत्तीनंतर दुसऱ्याची तडकाफडकी निवृत्ती याहून अधिक मैत्रीची ओळख करून देयची तरी कशी?
टीम इंडियाचे स्पिनर्सची जोडी म्हणून अनेक रेकॉर्ड नावावर असलेल्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची जोडी देखील तेवढीच मजबूत आहे.
भारताचे दोन स्टार सलामीवीर शुभमन गिल आणि ईशान किशन यांची मैत्री देखील चर्चेत असते. मैदानात देखील त्यांच्या करामती पहायला मिळतात.