'तो गेल्यानंतर 2 वर्षे मी सगळ्यांपासून लांब झाले अन्...', दीपिकानं केला होता खुलासा

Diksha Patil
Aug 06,2023

दीपिका कक्कड

दीपिकाचा आज 6 ऑगस्ट रोजी 37 वा वाढदिवस आहे. तिचा वाढदिवस ती तिच्या मुलासोबत आणि कुटुंबासोबत साजरा करत आहे.

दीपिका आणि शोएब

दीपिका आणि शोएब यांची जोडी लोकप्रिय असून त्यांची पहिली भेट ही 2011 मध्ये 'ससुराल सिमर का' या मालिकेच्या सेटवर झाली होती.

शोएबशी विवाह करण्याआधी झालं होतं लग्न

शोएबशी विवाह करण्याआधी दीपिकाचं लग्न हे रौनक सॅमसनशी झाली होती. पण 2015 मध्ये ते विभक्त झाले.

दीपिकाचा घटस्फोट होण्यासाठी शोएब जबाबदार

दीपिकाचा रौनकशी घटस्फोट झाल्यानंतर त्यासाठी सगळ्यांनी शोएब जबाबदार असल्याचे म्हटले होते. पण दीपिकानं असं नसून लग्नानंतर त्यांच्यात सतत वाद होत होते. तिला खूप त्रास होत होता.

घटस्फोटाआधी शोएबसोबत रिलेशनशिप?

दीपिका घटस्फोटाआधी शोएबसोबत रिलेशनशिपमध्ये होतं या फक्त अफवा आहेत असं तिनं सांगितलं होतं.

शोएब गेला म्हणून दोन वर्षे सगळ्यांपासून होती लांब

2013 मध्ये शोएबनं 'ससुराल सिमर का' ही मालिका सोडली त्यावेळी दीपिका दोन वर्षे सगळ्यांपासून लांब राहिली होती. त्यानंतर तिला शोएबवर असलेल्या फिलिंग्स विषयी जाणवले.

दीपिका आले होते anxiety अटॅक

दीपिकानं सांगितलं होतं की शोएबनं मालिका सोडल्यानंतर सेटवर तिनं सगळ्यांपासून दोन वर्षे स्वत: ला लांब ठेवलं होतं. त्याच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता तेव्हा मला Anxiety अटॅक येऊ लागले होते.

हळूहळू आले जवळ

त्यानंतर शोएब आणि दीपिका हळू हळू एकमेकांच्या जवळ आले. काही काळानंतर दीपिका आणि शोएबनं त्यांच्या रिलेशनशिपला जगजाहिर केले. (All Photo Credit : Dipika Instagram)

VIEW ALL

Read Next Story