जहीर-सागरिकाच्या घरातील पाडव्याचे Inside Photos; गुढीला पोळ्यांचा नैवैद्य अन् शिरकुर्म्याचा आस्वाद

जहीरच्या घरी पारंपारिक गुढीपाडवा

भारताचा माजी क्रिकेटपटू जहीर खानने अगदी पारंपारिक पद्धतीने पत्नी सागरिकासहीत गुढीपाडवा साजरा केला.

गुडीपाडवा सेलिब्रेशनचे काही खास क्षण

सागरिकानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या गुडीपाडवा सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

दोघेही पिंक थिममध्ये

जहीरने गुलाबी कुर्ता परिधान केला असून सागरिकाने हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

नैवैद्याच्या ताटात पुरणपोळी अन् शिरकुर्म्याचा उल्लेख

विशेष म्हणजे नैवद्याला पुरपोळी दिसत असून या पोस्टमध्ये सागरिकाने शिरकुर्म्याचा उल्लेखही केला आहे. सागरिकाने दिलेल्या कॅप्शनमधून दोन्ही गोड गोष्टी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरी तयार करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

सेल्फीही केला शेअर

जहीर आणि सागरिका या दोघांनी एक सेल्फीही शेअर केला आहे.

अनेक वर्ष करत होते डेट

जहीर आणि सागरिका हे लग्नापूर्वी अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

2017 साली लग्न

अखेर 2017 साली जहीर सागरिकाबरोबर विवाहबंधनात अडकला.

जहीर मूळचा अहमदनगरचा

जहीरचा जन्म हा महाराष्ट्रातील अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील आहे.

दोघेही एकत्र साजरे करतात सण

जहीर आणि त्याची पत्नी सागरिका हे दोघेही मराठी आहेत. मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्माचे पालन करत असले तरी दोन्ही धर्मातील प्रमुख सण एकत्रच साजरे करतात.

अनेकांनी केलं कौतुक

अनेकांनी पुरणपोळी आणि शिरकुर्म्याचा हा नैवैद्य पाहून जहीर आणि सागरिकाचं कौतुक केलं आहे.

सागरिकाने शेअऱ केलेले फोटो चर्चेत

सागरिकाने शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत

VIEW ALL

Read Next Story