नदी किनारी असलेला 24 कोटींचा मॅक्सेवेलचा आलिशान बंगला आणि त्याचे Inside Pics पाहून थक्क व्हाल

आलिशान बंगला

ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सेवलचा व्हिक्टोरियामधील अॅबरफिडील येथे फारच आलिशान आणि मोठा बंगला आहे.

सर्वोत्तम प्रॉपर्टी डेस्टीनेशन

नदी किनारी असलेला मॅक्सेवलचा हा परिसर येथील सर्वोत्तम प्रॉपर्टी डेस्टीनेशन म्हणून ओळखला जातो.

4 BHK घर

अॅबरफिडीलमधील 37 बिव्हर स्ट्रीट येथील हा बंगला एक 4 BHK घर आहे.

फार मोठं आंगणं

मॅक्सेवेलच्या या आलिशान बंगल्याला फार मोठं आंगणं आहे. या ठिकाणी मोठी पार्टीही आयोजित करता येईल एवढी जागा आहे.

फॉर्मल आणि कॅज्युअल डिझाइनचा मेळ

मॅक्सेवेलचा बंगल्यातील रुममधील फ्लोअर हाईट, रुमची लांबी-रुंदी सारं काही अगदी ऐसपैस आहे. रुममध्ये फॉर्मल आणि कॅज्युअल डिझाइनचा मेळ घातला आहे.

भरपूर मोकळी जागा

812 स्वेअर मिटरच्या जमीनीवर हा बंगला पसरलेला आहे. या बंगल्याच्या आजाबाजूला फार हिरवळ असून भरपूर मोकळी जागा आहे.

व्हिक्टोरियन शैली

3.4 मीटर सिलिंग, वेगळ्या शैलीत साकारलेले दरवाजे, मोठी झुंबरं या साऱ्यामधून व्हिक्टोरियन शैली अधोरेखित करण्यात आली आहे.

बंगल्याची वैशिष्ट्ये

टिंबर फ्लोअर्स, हिटींग आणि रेफ्रिजरेटर कुलींग, 4 गॅस प्लेसेस, स्टायलिस्ट फॅमेली बाथरुम अशी या बंगल्याची वैशिष्ट्ये आहेत.

सर्वोत्तम लाईफस्टाईल

मॉल्स, शाळा आणि मोठ्या बगीचा मॅक्सवेलच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहेत. या ठिकाणावरील सर्वोत्तम लाईफस्टाईल येथे उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story