विजय शंकर (Vijay shankar)

गुजरात टायटन्सला मिळालेला आणखी एक हिरा. टीम इंडियामधून बाहेर पडल्यानंतर विजय शंकरने आता पुन्हा आपली ताकद दाखवून दिलीये. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यात शंकरने विजयी खेळी केली होती.

कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gautam)

गौतमला दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात त्याने संधीचं सोनं करून दाखवलं. त्यामुळे आगामी काळात त्याच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल.

सुयश शर्मा (Suyesh Sharma)

कोणालाही अपेक्षा नसताना आपल्या फिरकीच्या जाळ्यात भल्या भल्या फलंदाजांना अडकवणारा सुयश शर्मा प्रभावी बॉलर ठरला आहे.

साई सुदर्शन (Sai Sudarshan)

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात प्रभावी राहिलेला युवा खेळाडू. सयंमी आणि मोक्याच्या क्षणी आक्रमक रूप धारण करणाऱ्या खेळाडूने गुजरातला दोन विजय मिळवून दिले आहेत.

व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)

कोलकाता नाईट रायजर्सकडून खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने सलामीला उतरून धुंवाधार खेळी केलीये. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याने इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका बजावली आहे.

Impact Players

पाच असे 'इम्पॅक्ट प्लेयर' जे खरंच मैदान मारलंय, कॅप्टनही हॅप्पी!

VIEW ALL

Read Next Story