फुटबॉलचा सामना सुरु असताना भरधाव वेगानं बॉलमागे पळणारे खेळाडू सातत्यानं थुंकताना दिसतात.
एखाद दुसरा नव्हे, तर, मैदानात असणारा प्रत्येक खेळाडू सतत थुंकताना दिसतो. जे पाहून अनेकांनाच किळस वाटते. पण, यामागचं कारण माहितीये?
अधिकाधिक व्यायाम केल्यामुळं खेळाडूंच्या शरीरातील लाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळं ते वारंवार थुंकतात.
जेव्हाजेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा या क्रियेदरम्यान तुमच्या लाळेमध्ये अतिरिक्त प्रोटीन मिसळलं जातं. वैज्ञानिक भाषेत या घटकाला MUC5B असं म्हणतात.
MUC5B हा घटक लाळ अधिक दाट करतो आणि ती गिळणं कठीण होतं, ज्यामुळं थुंकण्याच्या क्रियेला वाव मिळतो.
व्यायाम करताना ही क्रिया अधिकाधिक प्रमाणात घडते कारण, त्यावेळी नाकाऐवजी तोंडानं श्वास घेतला जातो. MUC5B या घटकामुळं तोंडाच्या आतील भाग कोरडा पडत नाही. आहे ना थक्क करणारं कारण?