पावसाळा म्हटलं की रानभाज्या या आल्याच. औषधांची खाण असलेल्या रानभाज्या खूप गुणकारी असतात
रानभाज्यांची माहिती असणारे आवर्जुन या भाज्या खातात.
पण जर तुम्ही पहिल्यांदा रानभाज्या खात असाल तर शिजवताना ही काळजी घ्यायलाच हवी.
रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषारीद्रव्ये आढळतात. त्यातून संसर्गाची शक्यता असते.
त्यामुळं रानभाज्या शिजवताना विशेष काळजी घेण्याची गरज असते.
काटेरी प्रकारातील भाज्यांना खड्याचे मीठ चोळून त्या पाण्यात उकळवून घ्या
काही रानभाज्यांचा देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवा
रानभाज्या पानांच्या असल्यास त्या गरम पाण्यात उकळवून घ्याव्यात.
रानभाज्या उकडून घेतल्याने त्यातील गुणधर्म कमी होत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)