भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सध्या झलक दिखला जा 11 या डान्सिंग रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनाले दाखल झालीये.
आपल्या डान्सने सर्वांची मन जिंकून घेणाऱ्या कोरिओग्राफर धनश्री वर्माला प्रेक्षकांची आणि चाहत्यांची दाद मिळताना दिसत आहे.
अशातच आता धनश्री वर्मावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धनश्रीच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाल्याची बातमी समोर आलीये.
धनश्रीच्या आजीचं निधन झाल्याची बातमी धनश्रीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत दिली आहे.
तू माझं नाव धनश्री ठेवलं हे मी कधीही विसरू शकत नाही. आयुष्यात मोठे आजार असूनही आजी तू आवडीचा मार्ग निवडला.
शौर्य आणि मानसिकदृष्ट्या खंबीर असणे हे एक शस्त्र आहे ज्याने आम्हा दोघींना एक स्त्री म्हणून कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्यासाठी तू दिलंस.
शेवटच्या वेळी मी तुझा हात धरेन असे कधी वाटले नव्हतं. तू दाखवलेल्या मार्गावर मी नेहमी चालत राहिल, असं धनश्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.