नवऱ्याला संधी न मिळाल्याने धनश्री वर्मा नाराज

इन्टाग्राम पोस्ट करत सुनावलं, म्हणते...

Aug 22,2023

फिरकीपटू

आशिया चषक स्पर्धेसाठी आता टीम इंडिया जाहीर झालीये. या संघात तीन फिरकीपटूंना स्थान देण्यात आलंय. कुपदीप यादव, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा.

यझुवेंद्र चहलला संधी नाही

वर्ल्ड कप भारतीय खेळपट्टीवर सामने असणार असल्याने यझुवेंद्र चहलला संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, त्याला संधी मिळली नाही.

धनश्री वर्माची पोस्ट

आशिया कपमध्ये सिलेक्ट न झाल्याने यझुवेंद्र चहलने एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता चहलची पत्नी आणि सोशल मीडिया स्टार धनश्री वर्माने पोस्ट केली आहे.

सिलेक्टर्सवर टीका

धनश्री वर्माने एक इन्टाग्राम पोस्ट शेअर करत सिलेक्टर्सवर सुचक शब्दात टीका केली आहे. तिने इन्टाग्राम दोन स्टोरी शेअर केल्या.


आता मी यावर गंभीरपणे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. अति विनम्र आणि अंतर्मुख असणं तुमच्या कामाच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकते का? असा सवाल धनश्रीने विचारला आहे.


आयुष्यात वाढण्यासाठी आपण सर्वांनी बहिर्मुख आणि रस्त्यावरील स्मार्ट जाणकार असणं आवश्यक आहे का? असा प्रश्न देखील तिने विचारला आहे.

थँक्यू

शेवटी हे सर्व तुमच्यात आणि तुमच्या देवावर अवलंबून असतं. जग तुमच्या सोबत आहे. थँक्यू, अशी पोस्ट धनश्रीने केली आहे.

VIEW ALL

Read Next Story