18 कोटी मागितल्याने Welcome 3 मधून 'मजनूभाई' Out?

अनिल कपूरने एवढी मोठी रक्कम का मागिली याची माहितीही समोर आली आहे. जाणून घेऊयात याचबद्दल...

तिसरा भाग लवकरच

अभिनेता अनिल कपूर हा 'वेलकम' फ्रेंचायझीचा भाग असून या सिरीजमधील तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

तिसऱ्या भागातून गच्छंती

'वेलकम' आणि 'वेलकम-2'मध्ये 'मजनूभाई'ची भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूरची तिसऱ्या भागातून मात्र गच्छंती झाली आहे.

उदय शेट्टीही आऊट

केवळ 'मजनूभाई' साकारणारा अनिल कपूरच नाही तर उदय शेट्टीची भूमिका साकारणारे नाना पाटेकरही या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दिसणार नाहीत.

अक्षय कुमार 'वेलकम-3' मध्ये

पहिल्या दोन भागांमध्ये भावांची भूमिका साकारणारे हे दोघेही तिसऱ्या भागात दिसणार नसले तरी अक्षय कुमार 'वेलकम-3' मध्ये दिसणार आहे.

फार जास्त मानधन

'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार अनिल कपूरने 'मजनूभाई'ची भूमिक साकारण्यासाठी फार जास्त मानधन मागितलं. त्यामुळे निर्मात्यांनी त्याला नकार दिला.

निर्मातेही थक्क झाले

'मजनूभाई'ची भूमिका साकारण्यासाठी अनिल कपूरने 18 कोटींची मागणी केली. ही मागणी ऐकून निर्माते फिरोज नाडियाडवालाही थक्क झाले.

...म्हणून मागितली मोठी रक्कम

'मजनूभाई'ची भूमिका फार लोकप्रिय झाली असून त्यामुळेच अनिल कपूरने एवढी मोठी रक्कम मागितल्याचं सांगितलं जात आहे.

अनिल कपूर अडून राहिला

अक्षय कुमारने अनिल कपूर आणि फिरोज नाडियाडवालादरम्यान पैशांवरुन मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र अनिल कपूर आपल्या मागणीवर अडून राहिला. त्यामुळे त्याला चित्रपटामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

कोण कोण असणार 'वेलकम-3'मध्ये?

अनिल कपूर नसला तरी 'वेलकम-3' पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये दिशा पाटनी, अरशद वारसी, सुनील शेट्टी, कृष्णा अभिषेक, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्तसारखे कलाकार झळकणार आहेत.

टायटल 'वेलकम टू द जंगल'

'वेलकम-3'चं टायटल 'वेलकम टू द जंगल' असं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story