ऑस्ट्रेलियन टीम सध्या इंग्लंडमध्ये असून अॅशेस मालिका-2023 खेळतेय. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे खेळवला जातोय.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर अॅलेक्स कॅरीबद्दल अशी बातमी समोर आली, जी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलंय.
अॅलेक्स कॅरी याच्याशी वाद निर्माण झाल्याचं समोर येतंय.
द सनच्या वृत्तानुसार, अॅलेक्स कॅरीने इंग्लंडमध्ये केस कापले पण त्याचे पैसे दिले नाहीत.
यासाठी कॅरीला 30 पाऊंड म्हणजेच जवळपास 3100 रुपये द्यावे लागणार आहेत.
अॅडम नावाच्या या हेअरस्टायलिस्ट आता कॅरीला सोमवारपर्यंत पैसे देण्याबाबत धमकी दिलीये.
इंग्लिश बेवसाईटमध्ये नमूद केल्यानुसार, एडमने म्हटलं की, मी वाट पाहतोय. जर सोमवापर्यंत पैसे दिले नाहीत तर वाईट परिणाम होतील.
कॅरीने त्याची परतफेड न केल्यास एडम पोलीस तक्रार दाखल करण्याचा विचार करणार आहे.