भारताने पहिल्याच कसोटी सामन्यात यजमान वेस्ट इंडिजयाच धुव्वा उडवला. या विजयाचा हिरो ठरला तो कसोटी पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल

Jul 15,2023


पहिल्याच कसोटी सामन्यात 171 धावांची खेळी करत यशस्वीने स्वत:ला सिद्ध केलंय. या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.


आता यशस्वीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. सामना संपल्यानंतर हॉटेलमध्ये आपल्या रुमवर जातानाचा हा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.


विजयामुळे खूप चांगलं वाटतंय, आम्ही सामना जिंकलो आणि पहिल्याच सामन्यात मला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल. ही तर फक्त सुरुवात आहे. अजून मोठी वाटचाल करायची असल्याचं यशस्वीने सांगितलं


या व्हिडिओत यशस्वीने आपल्या हातात प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी पकडली आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात आहे.


विंडीजविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत यशस्वीने शतक झळकावलं. परदेशात पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो पहिला भारतीय सलामीचा फलंदाज बनला आहे.


दुहेरी शतकापासून तो यशस्वी काही धावांनी हुकला. पण आपल्या खेळीने त्याने आपण लंबी रेसचा खेळाडू असल्याचं दाखवून दिलं आहे.


उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये 28 डिसेंबर 2001 मध्ये यशस्वीचा जन्म झाला. 12 वर्षांचा असताना तो मुंबईत आला आणि आझाद मैदानात त्याने क्रिकेटचे धडे गिरवले.


मुंबईत तो मुस्लिम युनायटेड क्लबचे कोच इमरान सिंहच्या तो संपर्कात आला. इमरान सिंह यांनी त्याला आपल्याकडे आसरा दिला.


विजय हजारे ट्रॉफीतली खेळी त्याच्या कारकिर्दीतील युटर्न ठरली. या स्पर्धेत त्याने 113, 22, 122, 203 आणि नाबाद 60 धावा केल्या होत्या.


स्पर्धेच्या पुढच्याच वर्षी यशस्वीने अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार फलंदाजी केली. या स्पर्धेत तो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता.

VIEW ALL

Read Next Story