पूर्ण ताकदीनिशी परतत आहे बुमराह

लवकरच करणार पुनरागमन

आगामी विश्वचषकात जसप्रीत बुमराह भारताला विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

सध्या कुठे आहे बुमराह?

जसप्रीत बुमराह सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) प्रशिक्षण घेत आहे. नेट प्रॅक्टिस दरम्यान तो रोज सात ते आठ षटकेही टाकतो आहे.

कधी परतणार संघात?

माध्यमांच्या वृत्तानुसार, जर सर्व काही ठीक झाले तर जसप्रीत बुमराहला पुढील महिन्यात आयर्लंडमध्ये होणाऱ्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात समाविष्ट केले जाऊ शकते.

क्राईस्टचर्चमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया

जसप्रीत बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरात शस्त्रक्रिया झाली होती. क्राइस्टचर्चमधील फोर्ट ऑर्थोपेडिक्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्काउटन यांनी शस्त्रक्रिया केली.

कधी होणार आहे स्पर्धा?

भारतीय संघाला 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान आयर्लंड दौऱ्यावर 3 टी-20 सामने खेळायचे आहेत.

टीम इंडियाच्या घातक गोलंदाजांपैकी एक

जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत 30 कसोटी सामने, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 128, एकदिवसीय सामन्यात 121 आणि T20 मध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाज

जसप्रीत बुमराह सध्या भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. बुमराह जुलै 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे तो सातत्याने संघाबाहेर होत आहे. (सर्व फोटो - PTI)

VIEW ALL

Read Next Story