पहिल्या U-19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचे खेळाडू आता काय करतात?

टीम इंडियाने 2000 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपवर पहिल्यांदा नाव कोरलं होतं. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 6 विकेटने पराभव केला

काही खेळाडू कॉमेंट्री तर काही खेळाडू अंपायर

पहिल्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी आता क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. यातले काही खेळाडू कॉमेंट्री तर काही खेळाडू अंपायर बनलेत.

मनीष शर्मा

सलामीचा खेळाडू मनीष शर्माने त्या स्पर्धेतील 8 सामन्यात 257 धावा केल्या होत्या. पण त्या सीनिअर संघात स्थान मिळालं नाही. त्याची क्रिकेट कारकिर्दी तिथेच संपली

रवनीत रिकी

सलामीचा दुसरा फलंदाज रवनीत रिकीने 8 सामन्यात 340 धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय फलंदाज ठरला होता. रवनीत सध्या एअरइंडियात क्रिकेट कोच आहे.

मोहम्मद कैफ

मोहम्मद कैफ विजेत्या टीम इंडियाचा कर्णधार होता. पुढे टीम इंडियासाठी तो 13 कसोटी आणि 125 एकदिवसीय सामने खेळला. सध्या कैफ कॉमेंट्रीच्या जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे.

युवराज सिंग

युवराज सिंग या स्पर्धेत 12 विकेट आणि 203 धावा केल्या होत्या. पुढे युवी टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू बनला. 2011 वर्ल्ड कप विजयात युवीचा मोठा वाटा होता. आता त्याने क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे.

रीतिंदर सोढी

रीतिंदर सोढीने त्या स्पर्धेत 134 धावा आणि 5 विकेट घेतल्या होत्या. पुढे भारतासाठी तो 18 वन डे खेळला. सध्या तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अंपायर आहे.

नीरज पटेल

नीरज पटेलने त्या स्पर्धेत 133 धावा केल्या होत्या. नीरजने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. 2015 मध्ये तो शेवटचा सामना खेळला

वेणुगोपाल राव

वेणुगोपाल रावने विजेत्या भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू होता. पुढे टीम इंडियासाठी तो 16 वन डे खेळला. सध्या वेणूगोपाल राव कॉमेंट्री करताना दिसतो.

शलभ श्रीवास्तव

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज शलभ श्रीवास्तवने त्या स्पर्धेत 14 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ससाठीही खेळला. मॅच फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयने त्याच्यावर 5 वर्षांची बंदी आणली.

VIEW ALL

Read Next Story