भारताचा आयर्लंड दौरा संपलाय आणि उत्सुकता आहे ती एशिया कप स्पर्धेची. पण आयर्लंड दौरा भारताचा उगवता स्टार रिंकू सिंहसाठी स्वप्नवत ठरला आहे.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंहची थेट टीम इंडियात निवड झाली. आयर्लंड दौऱ्यात टी20 सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

पदार्पणाच्या दुसऱ्या सामन्यात रिंकू सिंह प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आयर्लंडमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर रिंकू मायदेशी परतला आहे.

मायदेशी परतताच रिंकू सिंग घरी पोहोचला आणि त्याने आपल्या आई-वडिलांना जगातलं सर्वात मोठं सरप्राईज गिफ्ट दिलं. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं ही गिफ्ट होतं.

रिंकूने आपल्या इन्स्टाग्रामवर आई-वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या आई-वडीलांनी टीम इंडियाची जर्सी परिधान केली आहे.

या फोटोला रिंकूने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'जिथून आणि ज्यांच्या मुळे या प्रवासाला सुरुवात झालीय त्यांच्यासाठी'

आपल्या मुलाला टीम इंडियाच्या जर्सीत पाहण्याचं स्वप्न रिंकूनच्या आई-वडीलांना पाहिलं होतं. हे स्वप्न रिंकूने पूर्ण करुन दाखवलं आहे.

रिंकून आपल्या आई-वडीलांनी आपल्या आई-वडीलांचा केलेला सन्मान पाहून सोशल मीडियावर त्याचं कौतुक केलं जात आहे. मुलाने आई-वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्यासारखं दुसरा आनंद नाही असं युजर्स म्हणतायत.

VIEW ALL

Read Next Story