तूप की तेल...

कुठल्या दिवाने मिळतो जास्त फायदा?

हिंदू धर्मात दीप प्रज्वलन अतिशय महत्त्व आहे. पण अनेकांना हे माहिती नाही की तूपाचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असतो.

दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत, दिवा लावल्याने वातावरणात सकारात्मकता येते. म्हणजेच पूजेत तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावावा. जेणेकरून दिवा लावण्याचा पूर्ण लाभ मिळेल.

हिंदू धर्मात गाय अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. त्यामुळे पूजा-अभिषेक, देवाचे भोजन तयार करण्यासाठी गाईचे दूध आणि गाईचे तूप वापर होतो. त्याचप्रमाणे गाईच्या तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते.

तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. संध्याकाळी मुख्य दारावर तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. देवतेच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा, तर डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा. तर तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी पांढरी कापसाची वात असावी.

बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी चमेली आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. मंगळवारी चमेलीच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण केल्यास तुमच्यावरील संकट दूर होते.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे. यामुळे शनिदोष दूर होतो आणि शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळतं अशी मान्यता आहे.

तेलाच्या दिव्याचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी नेहमी लाल धाग्याचा दिवा लावा,असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तिळाच्या तेल असलेल्या दिव्यामध्ये लाल किंवा पिवळा धागा असावा.

दिवा लावताना विशेष मंत्राचा जप केल्यानेही तुम्हाला विशेष लाभ होतो.

'शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोस्तुते।। दीपो ज्योति परंब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:। दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते।।' (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story