लव्ह असो अथवा अरेंज मॅरेज असो... होणाऱ्या जावायला हे 5 प्रश्न विचाराच

मुलीचा हात हातात देण्याआधी...

तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील मुलीचं लग्न करण्याचा विचार करत असाल तर होणाऱ्या जावायला काही प्रश्न मुलीचा हात हातात देण्याआधी आवर्जून विचारायला हवेत.

हे 5 प्रश्न विचारायलाच हवेत

मुलीची निवड योग्य आहे की नाही हे समजून घेण्यासाठी होणाऱ्या जावयाला 5 प्रश्न विचारायलाच हवेत. हे पाच प्रश्न कोणते ते पाहूयात...

पहिलाच प्रश्न हा असावा

तुझ्या दृष्टीने लग्न म्हणजे काय? हा पहिला प्रश्न होणाऱ्या जावयाला विचारलाच पाहिजे.

..म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा

आपल्या घरातील मुलगी ज्याच्याबरोबर आयुष्यभर राहणार त्याच्या दृष्टीकोनातून लग्नाबद्दलच्या त्याच्या संकल्पना समजून घेतल्यास फायदा होईल. मुलगा लग्नासाठी तयार आहे की नाही यातून समजेल.

दुसरा प्रश्न मुलांबद्दलचा असावा

लहान मुलांबद्दल काय विचार करतो? हा प्रश्नही जावयला मुलीच्या घरातील वडीलधाऱ्यांनी आवर्जून विचारायला हवा.

मुलांसंदर्भातील प्रश्न महत्त्वाचा कारण...

आपल्या होणाऱ्या जावई उत्तम पालक होऊ शकतो की नाही याचा अंदाज बांधण्यासाठी मुलांबद्दल त्याला काय वाटतं हे समजून घेणं फायद्याचं ठरतं.

हा तिसरा प्रश्न हवा

दिर्घकालीन नातं टिकवण्यासाठी काय करशील? हा जावयला विचारला जाणारा तिसरा प्रश्न हवा.

मुलीच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा कारण...

आपल्या मुलीला हा मुलगा आयुष्यभर साथ देईल की नाही हे यामधून समजेल. तुमच्या मुलीसाठी तो आयुष्य समर्पित करु शकतो हा हे यातून समजेल.

चौथा प्रश्न हा असवा

संभाव्य भावी जावयाला लग्नाआधीच नवरीच्या घरच्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवल्यानंतर कसं वाटतं? हे ही विचारलं पाहिजे.

हा प्रश्न फार महत्त्वाचा

होणारा जावई हा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणारा हवा असं वाटत असेल तर हा प्रश्न फार महत्त्वाचा ठरतो. मुलीसाठी वेळ देणारा जावई हवा असं प्रत्येक आई-बापाला वाटतं.

पाचवा प्रश्न फार महत्त्वाचा

तुझ्यावर कोणत्याही पद्धतीचं कर्ज आहे का? हा शेवटचा प्रश्न मुलगी बघण्यासाठी आलेल्या मुलाला आवर्जून विचारलाच पाहिजे.

शेवटचा प्रश्न महत्त्वाचा का?

हा शेवटचा प्रश्न हा आर्थिक दृष्टीकोनातून फार महत्त्वाचा आहे. आपला होणारा जावई आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे हे यातून समजू शकतं.

VIEW ALL

Read Next Story