रियान पराग IN, अभिषेक-ऋतुराज OUT... चाहते संतापले

श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने 18 जुलैला टीम इंडियाची घोषणा केली. टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दोन वेगळे संघ निवडण्यात आले आहेत.

यापैकी टी20 मालिकेतल्या संघाबाबत निवड समितीने अनेक धक्कादायक निर्णय घेतलेत. ज्यावरुन क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत.

झिम्ब्बाब्वे दौऱ्यात आक्रमक शतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्च देण्यात आला आहे, तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडेही दुर्लक्ष करण्यात आलंय.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात रियान परागला संधी देण्यात आली आहे. वास्तविक झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ऋतुराज आणि अभिषेकनने दमदार कामगिरी केली आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात ऋतुराजने 5 पैकी चार सामन्यात 158.33 च्या स्टाईक रेटने 133 धावा केल्या होत्या.

तर आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिषेकने चार सामन्यात 124 धावा केल्या. यात एका खणखणीत शतकाचा समावेश आहे.

दुसरीकडि झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेत तीन सामन्यात रियान परागने 88.88 च्या अॅव्हरेजने केवळ 24 धावा केल्यात.

त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात रियान परागच्या निवडीवरुन चाहत्यांनी बीसीसीआयने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

VIEW ALL

Read Next Story