टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर जितका आक्रमक फलंदाजी करतो, तितकाच तो शिवीगाळ करण्यातही प्रसिद्ध आहे.

टीम इंडियातल्या खेळाडूंपैकी रोहित शर्मा सर्वात जास्त शिव्या देतो असा खुलासा श्रेयस अय्यरने केला आहे. एकाच वाक्यात तो दोन शिव्या देतो असं अय्यरने म्हटलंय.

द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमाचा दुसरा एपिसोड प्रदर्शित झाला. यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सहभागी झाले होते.

शिव्या का देतो असं रोहित शर्माला विचारलं असता त्याने मजेदार उत्तर दिलं. आमची मुलं आळशी कोंबडे आहेत, म्हणून मला शिव्या द्यावा लागतात, असं रोहितने सांगितलं.

इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने अपशब्दांचा वापर केला होता. ही सर्व वाक्य स्टम्प माईकमध्ये कैद झाली आणि त्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.

रोहित शर्मा सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामात खेळतोय. आयपीएलच्या सुरुवातीलच मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरुन मुक्त केलंय.

रोहित शर्माने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत चार सामन्यात 118 धाा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 171.01 इतका आहे.

VIEW ALL

Read Next Story