दुखापतीमुळे वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.
विश्वचषक स्पर्धेत 19 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली.
पायाला झालेली दुखापत गंभीर होती, हार्दिकला तात्काळ मैदान सोडावं लागलं. त्यानंतर संपूर्ण विश्वचषकातूनच तो बाहेर पडला
विश्वचषकात हार्दिक पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला पंधरा खेळाडूंच्या स्काडमध्ये संधी देण्यात आली.
विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याने पाच विकेट घेतल्या तर 11 धावा त्याने केल्या.
आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकते.