आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी अनेक घडामोडी घडत आहेत. रिटेन आणि रिलीज यादी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे. पण या निर्णयावर जसप्रीत बुमराह फारसा खूश नाहीए.

जसप्रीत बुमराहने आपल्या सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आहे. त्याचबरोबर एक टीकात्मक पोस्टही टाकली आहे.

या पोस्टवर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. असं झालं तर बुमराह कोणत्या संघात जाणार याची उत्सुकचा चाहत्यांना आहे.

जसप्रीत बुमराह कर्णधार पदाच्या शर्यतीत आहे. त्यामुळे तो अशा संघाच्या शोधात असले ज्या संघात कर्णधारपदाचा पर्याय उपलब्ध असेल.

अशात बुमराह समोर दोन पर्याय आहेत. सीएसकेमध्ये धोनीनंतर संघाला अनुभवी कर्णधाराची गरज भासणार आहे. पण लगेच बुमराहला कर्णधारपद देतीत याबाबत साशंकता आहे.

विराट कोहलीच्या बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सही लीडरच्या शोधात आहे. तसंच जोश हेजलवूडच्या जाण्याने आरसीबीला एका प्रमुख गोलंदाजाची गरज आहे.

VIEW ALL

Read Next Story