इडली हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. अनेकजण रोज सकाळी नाश्त्यात इडली खाणं पसंत करतात.

दरम्यान घरात इडली बनवल्यानंतर गृहिणी साबण आणि पाण्याने भांडं धुवून ठेवतात.

पण असं केल्यानंतरही भांड्याचा चिकटपणा जात नाही आणि खालचा काळे डाग जात नाहीत.

पण तुम्ही नेहमीप्रमाणे न धुता जर चांगल्या प्रकारे भांडं धुतलं तर ते नेहमी चकाकत राहील.

एक कप पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकून मिसळा. यानंतर त्यात कापूस बुडवून ठेवा.

आता त्या कापसाने भांड्याची जाळी नीट स्वच्छ करुन घ्या. यामुळे चिकटपणासह काळे डागही निघून जातील.

जर तुम्ही इडलीच्या भांड्याला बेकिंग सोडाच्या पाण्यात भिजवून ठेवलं तर जाळीखाली असणारी घाणही निघून जाईल.

VIEW ALL

Read Next Story