भारताचा विकेटकिपर फलंदाज ईशान किशनने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अचानक ब्रेक घेतलाय.

ईशान किशनने यासाठी वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं आहे. ईशानच्या जागी केएस भरतला संघात संधी देण्यात आली आहे.

अशात क्रिकेट चाहत्यांनी ईशान किशन लग्न करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळेच त्याने इतकी मोठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असावा.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान किशन त्याची कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडियाबरोबर लग्न करु शकतो. या बातमीचा कोणताही दुजोरा नाही.

अदिती हुंडिया एक प्रसिद्ध मॉडेल आहे. गेल्या काही काळात ईशान किशन आणि अदितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अदिती मिस इंडिया 2017 ची फायनलिस्ट होती. आयपीएलच्या सामन्यात ईशान किशनला चिअर करतानाही अनेकवेळा ती स्टेडिअममध्ये दिसली होती.

अदिती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अदितीचे 3 लाख 14 हजार फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story