2023 या वर्षामध्ये उद्योग जगतात अनेक बड्या उद्योजकांनी उल्लेखनीय कामगिरी करत कोट्यवधी, अरबोंची कमाई केली.
वार्षिक कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यासह भल्याभल्या प्रस्थांना एका महिलेनं पिछाडीवर टाकत त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. या महिला कोण? तुम्ही ओळखलं का?
यांचं नाव आहे, सावित्री जिंदाल. त्यांची वार्षिक कमाई आहे, 25.3 अब्ज डॉलर.
2023 या वर्षामध्ये सावित्री जिंदाल यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये 9.58 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.
मुकेश अंबानी (Mukehsh Ambani) यांचं वार्षिक उत्पन्न 92.3 अब्ज डॉलर इतकं आहे. पण, 2023 मध्ये मात्र त्यांची वार्षिक कमाई 5.16 अब्ज डॉलर्स इतकीच होती.
सावित्री जिंदाल यांच्यामागोमाग श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलच्या शिव नाडर यांचं नाव येत असून त्यांच्या नावे 8.12 अब्ज डॉलर्स इतकी कमाई आहे.
सावित्री जिंदाल या ओपी जिंदाल समुहाच्या चेयरपर्सन एमिरेटस आहेत. या समुहाची सुरुवात त्यांचे पती ओम प्रकाश जिंदाल यांनी केली होती.
जिंदाल यांची जेएसडब्लू ही कंपनी स्टील उत्पादनाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करत असून, या समुहाचं काम जेएसडब्लू एनर्जी, जिंदल पॉवर, जिंदल होल्डिंग्स, जेएसडब्लू सॉआणि जिंदल स्टेनलेस अशा क्षेत्रांमध्येही प्रगतीच्या वाटांवर असल्याचं दिसत आहे.