भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघादरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार विजय मिळवला
या सामन्यात भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने इतिहास रचला. स्मृती मंधानाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम रचलाय.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा गाठणारी स्मृती मंधाना ही दुसरी भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे.
स्मृती मंधानाने 122 टी20 क्रिकेट सामन्यात तीन हजार धावा पूर्ण केल्या. याआधी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर हा विक्रम जमा आहे.
टी20 क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाने रोहित शर्मा-विराट कोहलीच्या 3000 क्रिकेट क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरलीय.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 141 धावात आटोपला. टीम इंडियाने एक विकेट गमावत हे आव्हान पार केलं. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने 137 धावांची भागिदारी केली.