अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिकायची ईच्छा असते, पण परदेशात शिकण्यासाठी जास्त पैसे लागत असल्यानं अनेकांच हे स्वप्न अपूर्ण राहतं.
पण तुम्हाला माहित आहे का? 5 असे देश आहेत जे भारतीय विद्यार्थ्यांना मोफत उच्चशिक्षण देत आहेत.
कोणते आहेत ते 5 देश आहेत जिथं भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मोफत मिळतं पाहूयात...
जर्मन पब्लिक युनिर्वसिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. पण विद्यार्थ्यांना तिकडे राहण्यासाठी काही प्रमाणाततिथे राहण्यासाठीचा काही खर्च विद्यार्थ्यांना उचलावा लागतो.
उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रिया हा देश सर्व विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे,ऑस्ट्रिया युनिर्वसिटीत विद्यार्थ्यांना फक्त 60,000 रुपये इतकी ट्युशन फी भरावी लागते.
भारतीयांना मोफत शिक्षण देणाऱ्या देशांमध्ये नॉर्वेचंही नाव आहे. या देशातही स्थानिक मुलांबरोबरच परदेशी मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जातं.
आइसलॅंडच्या पब्लिक युनिवर्सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण मोफत दिलं जातं पण इतर देशांच्या तुलनेत आइसलॅंडमध्ये राहणं जास्त खर्चिक असू शकतं.
फिनलँड इतर नॉर्डिक देशांप्रमाणे, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतं. फिनलँड मध्ये, विद्यार्थ्यांना बॅचलर किंवा मास्टर्स स्तरावरील कोर्सेससाठी कोणतीही फी भरावी लागत नाही. यासोबतच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिलं जातं.